२०२० मध्ये 'या' सेलिब्रिटिंनी दिली गुड न्यूज

01/6
२०२० या वर्षांत अनेक सेलिब्रिटींनी गुड न्यूज दिली. काही सेलिब्रिटींच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तर काही सेलिब्रिटींच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याची चाहूल लागणार आहे. विराट अनुष्कापासून ते अगदी करीना कपूर आणि सैफ अली खानपर्यंत अनेक कलाकार आईबाबा होणार आहेत.
02/6
करीना कपूर आणि सैफ अली खान खान कुटुंबात नवा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी करीनानं लॉकडाऊनमध्ये दिली. करीनाचं बाळ मार्च २०२१ मध्ये जन्माला येणार आहे. गर्भवती असतानाही करीनानं लाल सिंह चड्ढा सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
03/6
विराट-अनुष्का २०१७ मध्ये अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विराट आणि अनुष्काचं लग्न झालं. २७ ऑगस्ट २०२० मध्ये अनुष्कानं तिच्या बेबी बम्पचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन तिच्याकडची गूड न्यूज जगजाहीर केली. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच विराट आणि अनुष्काचं बाळ जन्माला येणार आहे.
04/6
अमृता राव - रेडिओ जॉकी अनमोल नोव्हेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आई झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. अभिनेत्री अमृता आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी अनमोल यांनी २०१६ मध्ये लग्न केलं. त्याआधी ७ वर्ष ते रिलेशनशीपमध्ये होते. अमृता आणि अनमोलने सात वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केलं. त्यांनी फक्त कुटुंबीयांबरोबर छोटेखानी लग्नसोहळा केला होता.
05/6
शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी २० फेब्रुवारी रोजी मुलगी झाल्याची घोषणा केली. समिषा असं तिनं मुलीचं नाव ठेवलं. सरोगसीच्या माध्यमातून तिला मुलगी झाली. शिल्पा आणि राज यांना ८ वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव वियान आहे.
06/6
हार्दिक पांड्या-नताशा स्टॅनकोविक ३० जुलै २०२० रोजी भारताचा ऑल राऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं. हार्दिकनं आपल्या बाळाचे नाव अगस्त्य ठेवलं आहे. हार्दिक युएइमध्ये आयपीएल खेळत असला तरी मुलाचे फोटो तो शेअर करत असतो.
पुढील बातमी
इतर बातम्या