'रेस ३' चित्रपटाची सुरुवातीपासूनच चर्चा होती. या चर्चेचं पहिलं कारण म्हणजे सलमान खान! सलमान खान 'रेस' चित्रपट मालिकेत पहिल्यांदाच झळकणार आहे. आता दुसरी चर्चा अशी की, सलमानसोबत या चित्रपटात बॉबी देओल पण दिसणार आहे. त्यामुळे बॉबी देअोलचे चांगले दिवस सुरू झाले आहेत, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.
'रेस ३' चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी यांनी ट्वीटरवर यासंदर्भात घोषणा केली. 'बॉबी तुझं कुटुंबात स्वागत आहे,' अशी पोस्ट त्यांनी केली आहे. रमेश तौरानी आणि बॉबी यांनी 'सोल्जर' चित्रपटात काम केलं आहे. 'रेस ३' चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोघं एकत्र काम करणार आहेत.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रमेश तौरानी म्हणाले की, 'मी यापूर्वीसुद्धा 'सोल्जर' आणि 'नकाब' या चित्रपटात बॉबीसोबत काम केलं आहे. तो चांगला अभिनेता आहेच. शिवाय त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभवही चांगला होता. 'रेस ३' मध्ये बॉबी एका नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.'
नोव्हेंबर महिन्यापासून 'रेस ३' चित्रपटाचं शुटिंग सुरू होणार आहे. चित्रपटात सलमान खान, बॉबी देओल आणि जॅकलिन फर्नांडिस असणार आहे. 'रेस ३' चित्रपटाचं दिग्दर्शन कोरिओग्राफर रेमो डिसूजा करणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २൦१८ मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा