चित्रपटसृष्टीत अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं १४ जून रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी त्यानं मुंबईतील वांद्रा इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. मागील सहा महिन्यांपासून तो नैराश्यानं ग्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. सुशांतनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ट्विटरवर आपल्या स्वप्नांची एक यादी शेअर केली होती. यामध्ये त्यानं आपल्या ५० स्वप्नांबद्दल सांगितलं होतं.
१४ सप्टेंबर २०१९ रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुशांतनं आपल्या ५० स्वप्नांबद्दल सांगितलं होतं. त्यानं लिहिलं होतं की, 'माझी ५० स्वप्नं आणि मोजणी सुरुच आहे...' पण ही स्वप्नं पूर्ण न करताच कायमचा निघून गेला सुशांत
- विमान चालवण्याचं प्रशिक्षण
- आयर्नमॅन ट्रायथलॉनचं ( स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग) प्रशिक्षण घेणं
- डाव्या हातानं क्रिकेट खेळणं
- मोर्स कोड ( टेलिकम्युनिकेशन लॅग्वेंज) शिकणं
- अंतराळाविषयीची माहिती जाणून घेण्यास उत्सुक विद्यार्थ्यांना शिकवणं
- चार टाळ्या वाजवून करण्याची पुशअप्स स्टाइल
- एक हजार झाडे लावणं
- दिल्ली कॉलेजच्या वसतिगृहात एक संध्याकाळ घालवणं
- कैलास पर्वतावर बसून ध्यानधारणा करणं
- एक पुस्तक लिहिणं
- सहा महिन्यांत सिक्स पॅक अॅब्स बनविणं
- एक आठवडा जंगलात राहणं
- ज्योतिषशास्त्राचा अभ्साय करणं
- किमान १० नृत्य प्रकार शिकणं
- शेती करणं शिकणं
- गिटारवर आवडती ५० गाणी वाजवणं
- एका लॅम्बोर्गिनीचा मालक होणं
- स्वामी विवेकानंदांवर माहितीपट बनवणं
- व्हिएन्नामधील सेंट स्टीफन्स कॅथेड्रलला भेट देणं
- कॅपोइरा (अफ्रो-ब्राझिलियन मार्शल आर्ट्स) शिकणं
- रेल्वेमार्गे युरोप प्रवास करणं
- नासाच्या वर्कशॉपमध्ये भाग घेणं
- अंटार्क्टिकाला जाणं
- खेळाडूंसोबत बुद्धिबळ आणि टेनिस खेळणं
- ब्लू होलमध्ये पोहणं
- अॅक्टिव्ह व्होल्कॅनोचा फोटो काढणं
हेही वाचा