'चलती का नाम गाडी' सुसाट

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

कफ परेड - बाबू समझों इशारे, होरन पुकारे, पम पम पम... आजही ही गाणी ऐकली की, किशोरदादांची आठवण येतेच. हाच अनुभव यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रेक्षकांनी घेतला. सलाम फाउंडेशनच्या वतीनं ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटाचं नाट्य रुपांतरण केलं. महापालिका शाळांतले विदयार्थी आणि झोपडीतल्या मुलांनी केलेल्या या सादरीकरणानं सगळ्यांची मन जिंकली.

या नाटकाला अभिनेत्री विद्या बालनही हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांच्या सादरीकणानंतर अभिनेत्री विद्या बालनलाही राहवलं नाही आणि तिनंही या मुलांसोबत गाण्यावर ताल धरला. कार्यक्रमाला विदयासह, सिध्दार्थ रॉय कपूर, श्याम श्रॉफ, राधिका मुखर्जी, मनवा नाईक, मीना नाईक आदींचीही उपस्थिती होती. नाटक पाहून सर्वांनी मुलांचं कौतुक केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या