छोटी मालकीणचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीला

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

कोणत्याही मालिकेचं शीर्षक गीत हे त्या मालिकेची ओळख असते. त्याचप्रमाणे स्टार प्रवाहवरील 'छोटी मालकीण' या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेच्या शीर्षकगीतात आदर्श शिंदेचा सुरेल आवाज, मनात रेंगाळणारी चाल आणि लोकगीताशी नातं सांगणारे शब्द असा उत्तम योग जुळून आला आहे. त्यामुळेच 'छोटी मालकीण'चं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं आहे.

काय आहे शीर्षकगीत?

'वाऱ्यावर पसरले सूर मखमली, मनामंदी झुलली माझ्या तुझी सावली, रानोवनी पानोपानी प्रीत जागली, नजरेला जेव्हा तुझ्या नजर भेटली' असे रोमँटिक शब्द असलेलं हे शीर्षक गीत आहे. या गाण्यातून छोटी मालकीण रेवती आणि श्रीधर यांच्यातली केमिस्ट्रीही दिसून येते. त्यांच्या अव्यक्त नात्याविषयीही हे गाणं खूप काही सांगून जातं.

दररोज संध्याकाळी वाजणाऱ्या या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. हे गाणं अनेकांच्या मोबाईलची रिंगटोन झालं आहे. या गाण्याचं फिमेल व्हर्जन श्रुती आठवलेने गायलं आहे.

स्टार प्रवाहबरोबर काम करताना अगदी घरच्यासारखं वातावरण असतं. स्टार प्रवाहबरोबर चार-पाच मालिकांची गाणी मी गायलोय. स्टार प्रवाहनं मला मोठं केलं असंही म्हणता येईल. कारण, स्टार प्रवाहचा रिअॅलिटी शो 'आता होऊन जाऊ द्या'मधून मी महाराष्ट्रासमोर आलो. त्यामुळे स्टारप्रवाहशी माझे कायमच छान सूर जुळतात. मी आजवर गायलेल्या गाण्यांत 'छोटी मालकीण' हे एक वेगळं आणि खास असं गाणं आहे. ते प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतं याचा मला आनंद आहे.

- आदर्श शिंदे, गायक

पुढील बातमी
इतर बातम्या