कसं असेल मराठी बिग बॉस? इथे पाहा फर्स्ट लूक!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

बिग बॉस म्हटलं की भांडण, रूसवे फुगवे, कटकारस्थान ही सिलेब्रिटींची लुटूपुटूची भांडणं बघायला प्रेक्षकांना आजही फार आवडतं. लवकरच हा मनोरंजनाचा तिसरा डोळा मराठी चाहत्यांचं मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. आणि नुकताच कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीचा फर्स्टलूक प्रेक्षकांसमोर आला.

'बिग बॉस आता मराठीतूनही येणार', अशी घोषणा सलमान खानने बिग बॉस ११ च्या महाअंतिम फेरीच्या दिवशी केली. त्यानंतर ही बातमी सर्वप्रथम 'मुंबई लाईव्ह'ने तुम्हाला सांगितली होती.

सलमानने मराठी बिग बॉसची घोषणा केल्यानंतर एक उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. या बिग बॉसमध्ये नेमके कोणकोणते मराठी सेलिब्रिटी दिसणार? याबाबत प्रेक्षकांनी तर्कवितर्क लावायला सुरूवात केली आहे.

होस्ट कोण करणार?

बिग बॉस हिंदीच्या ११ सीझनचं होस्टिंग सलमान खानने केलं. त्यामुळे आता मराठी बिग बॉसचं होस्टिंग कोण करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, मराठी बिग बॉसचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार असल्याची माहिती सूत्रांनी 'मुंबई लाईव्ह'ला दिली आहे. २०१३ मध्ये रितेशने बिग बॉस मराठीमध्ये सुरू करण्याबबात इच्छा बोलून दाखवली होती. बिग बॉस सीझन ११ जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेनेही आपल्याला मराठी बिग बॉस होस्ट करायला आवडेल असं म्हटलं होतं.


हेही वाचा

'बिग बॉस'मधील भारदस्त आवाज कुणाचा माहिती आहे?

पुढील बातमी
इतर बातम्या