कपिलची छोट्या पडद्यावर वापसी, हसायला राहा तयार

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. गेले अनेक दिवस छोट्या पडद्यापासून लांब राहिला होता. मात्र आता तो पुन्हा एकदा धुमाकूळ घालयाला सज्ज झाला आहे. त्याच्या नवीन शोचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रमोत तो पूर्वीप्रमाणेच कॉमेडी करताना दिसत आहे.

काय आहे प्रोमोत?

प्रोमोत एक रिक्षावाला कपिलला सोनी चॅनलच्या ऑफिसमध्ये घेऊन जाण्यास मनाई करतो. त्याचा नकार ऐकून कपिल त्याला बाबा जी का ठुल्लू दाकवतो.

शोमध्ये कोण?

कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद आता प्रेक्षकांसाठी नवीन नाही. त्यामुळे कपिलच्या या नवीन शोमध्ये सुनील ग्रोवरच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. कारण सुनील या शोमध्ये सहभागी होणार नाही. मात्र शोमध्ये अनेक जुने कलाकार दिसणार आहेत. मात्र ते कोण असतील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्याचप्रमाणे काही नवीन कलाकार दिसण्याची शक्यता आहे. मात्र प्रमोत तो एकटाच दिसत असल्याने या शो मध्ये नक्की कोणते कलाकार असतील, हे अद्याप गुपीत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या