पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह अनेकांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. अशातच बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरीव मालिकांचे चित्रीकरणही बंद करण्यात आलं आहे. याचा फटका पोटावर हात असणाऱ्या मालिका आणि चित्रिकरण सेटवर कामगारांना बसला आहे. यांच्या मदतीला अनेक बॉलिवूड स्टार पुढे आले आहेत. यात आता भाऊजाननं देखील पुढाकार घेतला आहे.
बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान यानं या क्षेत्राशी निगडीत १६ हजार मजूरांना आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्या केलेल्या घोषणेनुसार मंगळवारपासून सलमान खाननं मजूरांना मदत करण्यास सुरुवात केली आहे.
चित्रपट-मालिका क्षेत्राशी निगडित १६ हजार मजूरांच्या बँक खात्यामध्ये सलमान खानकडून प्रत्येकी ३००० रूपये जमा करण्याची सुरुवात केली आहे. अशाप्रकारे दोन दिवसांमध्ये म्हणजेच, मंगळवार, बुधवारपर्यंत या सर्व मजूरांच्या खात्यामध्ये ४ कोटी ८० लाख रूपये जमा करण्यात आले, अशी माहिती फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे (FWICE) अध्यक्ष अशोक दुबे यांनी दिली.
हेही वाचा