बॉलिवूडचे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट बंद करण्यात येत आहे. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आता सायरा बानो यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वास्तविक, फैजल फारुकी हे दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट हाताळत होते. पण आता त्यांनी ट्विट करून चाहत्यांना कळवलं आहे की, कुटुंबानं दिलीप कुमार यांचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत ट्विटद्वारे माहिती देताना दिलीप कुमार यांचे प्रवक्ते फैसल फारुकी म्हणाले की, बरीच चर्चा आणि विचारविनिमयानंतर आणि सायरा बानो जी यांच्या संमतीनं मी प्रिय दिलीप कुमार साब यांचं हे ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या निरंतर प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.
दिलीप कुमार यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट बंद केल्याच्या घोषणेनंतर चाहत्यांनी त्यांची आठवण करून देत कुटुंबीयांच्या या निर्णयाचा आदर केला.
दिलीप कुमार यांचे ७ जुलै रोजी निधन झालं. अभिनेता गेल्या काही वर्षांपासून वयाशी संबंधित आजाराशी लढा देत होते. त्यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा अजूनही शॉकमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच सायराची प्रकृती खालावली होती, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे दिलीप कुमार यांनी १९६६ मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केलं. दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्यासोबत बैराग, दुनिया, गोपी आणि सगीना या चित्रपटांमध्ये काम केलं.
हेही वाचा