कर्करुग्ण मुलांसाठी आनंदोत्सव

वडाळा - कॅन्सर पेशंट्स अॅड असोसिएशन (CPAA) तर्फे 26 नोव्हेंबरला वडाळा येथील आयमॅक्स सिमेमागृहात संध्याकाळी सहा वाजता चिल्ड्रन्स कार्निव्हल साजरा करण्यात आला. कॅन्सरशी लढत असलेल्या या लहान मुलांच्या आयुष्यात एक आनंदाचा दिवस यावा यासाठी हा चिल्ड्रन्स कार्निव्हल साजरा करण्यात आला. या कार्निव्हलला (CPAA) असोसिएशनचे प्रमुख तसेच अभिनेत्री इशा गुप्ता उपस्थित होती. यामध्ये लहानग्यांसाठी खेळ, खाण्याचे पदार्थ, नाचगाणी अशी धमाल होती. कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी गेली 47 वर्ष हा कार्यक्रम CPAA या असोसिएशनतर्फे आयोजित केला जातो, असं असोसिएशनच्या संयोजक प्रज्ञा फाटक यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या