हृतिकचा नेत्रदानाचा निर्णय

  • मंदार जोशी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुंबई - रील लाईफवरचे आयुष्य रीअल आयुष्यात जगणारे कलाकार खूप मोजकेच असतात. पडद्यावरील आपली भूमिका आणि वास्तव जीवन यामध्ये ते कायमच अंतर ठेवतात. परंतु, प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशननं हे अंतर आता कमी करायचं ठरवलं आहे. काबीलमध्ये एका अंध नायकाची भूमिका साकारणाऱ्या हृतिकनं नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक त्यानं हा निर्णय त्याच्या वाढदिवशी म्हणजे गेल्या 10 जानेवारीलाच घेतला होता. परंतु, आपली ही इच्छा गुपीत ठेवावी, असं त्याचं मत होतं. परंतु, काबीलच्या यशानंतर त्यानं आपल्या या इच्छेबद्दल भाष्य केलं आहे. काबीलमधील भूमिका साकारताना अंध व्यक्तींना किती त्रास होत असेल, याची आपणास कल्पना आल्याचे हृतिक म्हणाला. काबीलवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी आता नेत्रदान चळवळीतही भाग घ्यावा, असंही मत हृतिकनं व्यक्त केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या