'काबिल'चं शूटिंग अवघ्या 77 दिवसांमध्ये

  • मंदार जोशी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुंबई - बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या 'काबिल' चित्रपटाची स्टोरी सध्या अनेकांना आकर्षित करीत आहे. त्यामधील सर्वात महत्त्वाची ठरलेली गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं कमी बजेट. अवघ्या 40 कोटींमध्ये बनलेल्या हा चित्रपट 77 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आला. एखादा व्यावसायिक हिंदी चित्रपट एवढ्या कमी दिवसांमध्ये चित्रीत होण्याची अलीकडच्या काळामधली ही पहिलीच वेळ आहे.

'काबिल'ची निर्मिती राकेश रोशन यांची असून दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केलं आहे. व्यावसायिक हिंदी चित्रपट पूर्ण करण्यासाठी किमान 125 ते 150 दिवस लागतात. एवढ्या दिवसांच्या चित्रीकरणामुळे स्वाभाविकपणे चित्रपटाचे बजेट वाढते. राकेश रोशन, संजय गुप्ता आणि अभिनेता हृतिक रोशनच्या परिपूर्ण तयारीमुळे हा चित्रपट एवढ्या कमी कालावधीत तयार झाला.

पुढील बातमी
इतर बातम्या