कपिल शर्मा पुन्हा होणार बाबा, २०२१ मध्ये गिन्नी देणार बाळाला जन्म

प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मानं चाहत्यांना पुन्हा एकदा गुड न्यूज दिली आहे. लवकरच कपिलच्या घरी दुस-यांदा पाळणा हलणार आहे. कपिल शर्माची पत्नी गिन्नी गर्भवती असून, जानेवारी २०२१ मध्ये ती आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. अलीकडेच भारती सिंगनं शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये गिन्नी तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली.

गिन्नीची काळजी घेण्यासाठी कपिल शर्माचे कुटुंब आणि गिन्नीची आईदेखील मुंबईला आली आहे. कपिल शर्माला या आधी एक मुलगी असून, अनायरा तिचं नाव आहे. कपिल नेहमीच तिचे क्युट फोटो शेअर करत असतो.

कपिलची मैत्रीण आणि कॉमेडियन भारती सिंगनं करवा चौथच्या निमित्तानं इन्स्टा लाइव्ह केलं होतं. या व्हिडिओत गिन्नीची छोटीशी झलक दिसली होती. यात तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसून येत होता.


हेही वाचा

अक्षय कुमारनं युट्यूबर विरोधात दाखल केला ५०० कोटींचा दावा

पुढील बातमी
इतर बातम्या