'हम आप के है कौन' या चित्रपटात दोन बहिणींची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे या जोडीने केलेल्या एका डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ते गाणं कोणतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण ते गाणं आहे 'लो चली मै'
खरंतर 'बकेट लिस्ट'च्या सेटवर' शुटिंग सुरू असताना एकाने त्यांचा 24 वर्षांपूर्वी गाजलेला चित्रपट 'हम आप के है कौन' या चित्रपटातील 'लो चली मै' हे गाण वाजवलं. त्या क्षणी या दोघींनी एकमेकांकडे पाहिलं आणि गाण्यावर ठेका धरला.
हा व्हिडिओ पाहून 'चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं' ट्वीट करण जौहरने केलं आहे.