प्रत्येकाच्या जीवनावर राशींचा प्रभाव असतो हे आपण नेहमीच ऐकत असतो. कित्येकजण याचा अनुभवही घेत असतात. असाच वास्तववादी अनुभव आता मनोरंजनाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.
या राशींच्या वैशिष्ट्यातून अनेक गमतीजमती घडत असतात. अशाच बारा राशींच्या गमतीशीर कथा ‘आलंय माझ्या राशीला’ या सिनेमात पहायला मिळणार आहे. अश्विनी आनंद पिंपळकर या चित्रपटाच्या निर्मात्या असून निर्मिती सावंत यांच्यासह मकरंद अनासपुरे, प्रशांत दामले, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक आदी मराठीतील दिग्गज कलाकार या सिनेमात वेगवेगळ्या राशीचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत. या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे.