225 फूट उंचीचे चित्र काढून अमिताभना दिले बर्थडे गिफ्ट

बॉलिवूडचे शहेनशाह म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला मंगळवारी 75वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 मध्ये उत्तर प्रदेशच्या इलाहाबाद येथे झाला. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन हे एक प्रसिद्ध कवी आणि लेखक होते.

त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत राहणाऱ्या रंजित दहिया नावाच्या कलावंताने वांद्र्यातील एका 225 फूट उंचीच्या इमारतीवर अमिताभ यांचे भलमोठे चित्र काढले आहे. 

रंजित दहियाने अशा प्रकारे अनेकदा महानायाक अमिताभ बच्चन यांचे विविध चित्र विविध ठिकाणी रेखाटली आहेत.

अमिताभ यांना बनायचे होते इंजिनिअर

अमिताभ बच्चन यांना खरेतर अभिनेता नाही तर इंजिनिअर बनण्याचे होते. याचसोबत हवाई दलात जाण्याची त्यांची इच्छा होती. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. ज्यामध्ये तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि बारा फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे.

सर्वश्रेष्ठ अभिनेते म्हणून त्यांनी सर्वात जास्त पुरस्कार मिळवले आहेत. 1984 ते 1987 मध्ये अमिताभ बच्चन हे संसदेचे सदस्य राहिले.

त्यांचे वाढदिवस असल्याने अनेक कलाकार, दिग्गज नेते आणि राष्ट्रपतींनी ट्विट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा - 

बिग बींना राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून शुभेच्छा

पुढील बातमी
इतर बातम्या