'लव्ह लग्न लोचा'मध्ये मयुरी वाघची एन्ट्री

झी युवावरील 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेत सध्या बरीच धमाल सुरू आहे. आकांशा आणि श्रीकांत यांच्या लग्नाचा घोळ आणि विनय आणि गॅंगने केलेली धमाल, अभिमान आणि शाल्मलीच्या आयुष्यात येणाऱ्या बाळाची चाहूल, राघव आणि काव्याचं प्रेम प्रकरण या सर्वांमुळं ही मालिका आणखी रंगतदार बनली आहे. 

सुमित आणि सौम्याच्या एक्झिटनंतर त्यांच्या जागी कुणी येणार की नाही? या बद्दल प्रेक्षकांना शंकाच होती. मात्र आता 'लव्ह लग्न लो'चा मध्ये एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. ऋतू असं या नवीन पात्राचं नाव असून, सर्वांची लाडकी अभिनेत्री मयुरी वाघ ही भूमिका साकारणार आहे.

ऋतू अतिशय स्मार्ट आणि मॉडर्न मुलगी आहे. करिअरवर फोकस असणाऱ्या ऋतूला लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. सध्या या मालिकेत काव्या ही सगळ्यात बिनधास्त कॅरेक्टर आहे पण ऋतूतिच्यापेक्षा जास्त बिनधास्त असणार आहे. 

ऋतू लेखिका असून ती वृत्तपत्र आणि मासिकांसाठी प्रेम, नातेसंबंध या विषयांवर लेख लिहीत असते. मात्र स्वत:ला ऋतूला प्रेमाचा कुठलाही अनुभव नाही. आता ऋतू 'लव्ह लग्न लोचा'च्या टीममध्ये कशी फिट बसते हे बघणे महत्वाचे ठरेल .


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या