'चुकीला माफी नाही', मुंबई पोलिसांनी वरूण धवनला बजावलं

मुंबईच्या रस्त्यांवरील नियम मोडाल तर आता निश्चितच तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण "इथे चुकीला माफी नाही" याचा प्रत्यय अभिनेत्या वरुण धवनलाही आला आहे.

एका चाहतीची इच्छा पुरवण्यासाठी गाडीतून डोके बाहेर काढून तिच्यासोबत काढलेल्या सेल्फीमुळे वरुणला करवाईला सामोरे जाव लागणार आहे. मुंबई पोलिसांनी वरूण धवनचे चक्क चलानच फाडले आहे. इतकेच नाही तर 'असे परत केल्यास कडक करवाई करू' असे देखील बजावले आहे. वरुणचा हा सेल्फी एका वृत्तपत्रात आला असून त्याच आधारावर पोलिसांनी ही करवाई केली आहे.

काय म्हटले आहे मुंबई पोलिसांनी?

'वरुण असे अॅडव्हेंचर्स हे फक्त पडद्यावर चलतात. पण मुंबईच्या रस्त्यावर नक्कीच नाही. तुम्ही तुमच्यासह तुमच्या चाहतीचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातला आहे. तुमच्यासारख्या सुजाण मुंबईकरांकडून आणि तरुणांच्या आयकॉनपासून चांगल्याची अपेक्षा करतो. तुमच्या घरी ई-चलान पाठवण्यात येत असून पुढच्या वेळी मात्र आम्ही कडक कारवाई करू'.

वरुणने मागितली माफी

दरम्यात वरुणने माफी देखील मागितली असून पुन्हा असे न करण्याचे म्हटले आहे. 'त्यावेळी गाडी सिंग्नलला थंबवली होती. मला माझ्या चाहतीची भावाना दुखवायाची नव्हती. मात्र पुढच्या वेळी मी सुरक्षेला प्राधान्य देईन आणि अशा गोष्टींची काळजी नक्कीच घेईन', असेही वरुणने कबूल केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या