नागपूर अधिवेशन एक सहल

मुंबई - अधिवेशनाचे मार्मिक चित्रण निर्माता अनिल जळमकर यांनी ‘नागपूर अधिवेशन एक सहल’ या मराठी चित्रपटातून मांडलंय. या चित्रपटातून अधिवेशनाची एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केलाय. राजकारणापलीकडचे राजकीय रंग या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळतात. करोडो रुपये खर्च करून पार पडणाऱ्या अधिवेशनात अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. अशा अनेक बाबींवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलंय.

या चित्रपटाची सह-निर्मिती ययाति नाईक यांनी केलीय. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. मकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, मोहन जोशी, भारत गणेशपुरे या कलाकारांसह विनीत भोंडे, चेतन दळवी, अमोल ताले, संकर्षण कऱ्हाडे, दिपाली जगताप, स्नेहा चव्हाण आदी कलाकारांनी अफलातून भूमिका साकारल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या