'मुद्दा आहे जग बदलण्याचा'

प्रभादेवी - 'मुद्दा आहे जग बदलण्याचा' या ग्रंथाच्या दुसऱ्या, सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शनिवार प्रभादेवीतल्या भूपेश गुप्ता भवनात झाला. जगादल्या बदलांचं वैचारिक आणि सैद्धांतिक तत्वज्ञान डॉ. भारत पाटणकर यांनी या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीत मांडताना, पहिल्या आवृत्तीवरील टीकात्मक लेखनाचा समावेश या आवृत्तीत केल्याचं सांगितलं. नव्या आणि जुन्या पुस्तकाचा परीचय कॉ. अनिल सावंत यांनी करून दिला. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डॉ. कुंदा प्रमिला नीळकंठ यांनी केलं.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. भीमराव बनसोड, डॉ. भारत पाटणकर, डॉ. गेल ऑम्वेट, कॉ. शैलेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या