‘नागिन 3' चा नवा अवतार

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • मनोरंजन

कलर्स टीव्हीवर प्रसारित होणारा एकता कपूरचा पॉप्युलर शो ‘नागिन’चा नवा अवतार आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच ‘नागिन’च्या तिसऱ्या सिरीजचा म्हणजेच ‘नागिन 3’ चा प्रोमो रिलीज झाला.

काय आहे या प्रोमोत?

या प्रोमोत दोन व्यक्ती एका मुलीला उचलून नेत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पुढे हे दोघेही तिला जमिनीवर आदळतात. त्यावेळी ती मुलगी बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा त्या मुलीच्या चारही बाजूला सापाचा गुंतावळा येतो. मुलगी जेव्हा डोळे उघडते तेव्हा तिच्या डोळ्यासमोर भयावह दृष्य असतं.

या दोघींची जागा यांनी घेतली

हा प्रोमो बघून अंदाज बांधला जाऊ शकतो की ही मालिका देखील आधीच्या सीरीजप्रमाणे इच्छाधारी नागिनवरच आधारीत असेल. नागिनच्या या नव्या सीरिजमध्ये मौनी रॉय आणि अदा खानची जागा सुरभी ज्योती आणि अनिका हसनंदानी यांनी घेतली आहे.

नागिनच्या मागील दोन्ही सिजनला दर्शकांची चांगलीच पसंती मिळाली होती. म्हणूनच एकता कपूरने जराही वेळ न घालवता या शोचा नवीन सीजन घेऊन येत आहे. यापूर्वी नागिन 3 हा शो स्टार प्लसवर प्रसारित होणार असल्याचा अंदाज बांधला जात होता. पण प्रोमोच्या नंतर आता हा शो कलर्सवरच प्रसारीत होणार हे निश्चित झालं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या