राधिका आपटेच्या 'पार्च्ड'ची चर्चा

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

काही दिवसांपूर्वी 'पार्च्ड' या सिनेमातील काही बोल्ड सीन व्हायरल झाल्याने राधिका आपटे चांगलीच चर्चेत आली. नुकताच या सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात राधिका आणि आदिल हुसैन यांच्यासह सुरवीन चावला आणि तनिष्ठा चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचा सहनिर्माता अजय देवगण आहे. तर दिग्दर्शन लीना यादव यांनी केले आहे. हा सिनेमा १७ जून रोजी यूएसमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतात हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा राजस्थानातील ‘उझास’ या एका छोट्याशा गावातील आहे. चित्रपटातील कथा तीन तरुणींवर आधारीत असून भारतीय स्त्रियांना कशाप्रकारे परंपरेमध्ये अडकवले गेले यावर सिनेमात भाष्य करण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या