'हॅरी पॉटर'मध्ये मुख्य भूमिका साकारणा-या 'या' कलाकाराचे निधन

हॅरी पॉटर चित्रपटात हॅग्रीडची भूमिका करणारा अभिनेता रॉबी कोलट्रेन यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.

हॅरी पॉटरशिवाय रुबेस रॉबी कोल्टरेनब्रिटीश टीव्ही मालिकेत क्रॅकरमधील भूमिकेसाठी ओळखले जायचे. 

रॉबी कोल्टरेनयांच्या निधनानंतर ट्विटरवर अनेकांनी त्यांच्या आठवणी जागवणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. हॅरी पॉटरमधील हॅग्रीडची भूमिकेला रॉबी कोल्टरेनयांनी न्याय दिल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

रॉबी कोल्टरेनयांच्या प्रवक्त्या बेलिंदा राईट यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्कॉटलंडमधील रुग्णालयात कोल्टरेनयांचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, कोणत्या कारणामुळं निधन झालं हे त्यांनी सांगितलं नाही.

१९९० च्या दशकातील क्रॅकरमधील डिटेक्टीव्हच्या भूमिकेमुळं रॉबी कोल्टरेनचर्चेत आले होते. त्यांना ब्रिटीश अकादमी टेलिव्हिजनचा पुरस्कार सलग तीन वर्ष मिळाला होता.

२००१ ते २०११ मध्ये आलेल्या हॅटी पॉटर फिल्मस च्या मालिकेती त्यांनी हॅरी पॉटरच्या मेंटरची भूमिका पार पाडली होती. जेम्स बाँड थ्रिलर्स गोल्डन आय आणि द वर्ल्ड इज नॉट इनफमध्ये देखील त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

पुढील बातमी
इतर बातम्या