नवीन वर्षात सई ताम्हणकरचा अाणखीनच बोल्ड अंदाज

मराठी चित्रपटसृष्टी दिवसेंदिवस अधिकच बोल्ड होत चालली अाहे. फॅशन, ग्लॅमर याबाबतीत अाता मराठी अभिनेत्रीही सरस ठरू लागल्या अाहेत. त्यात सर्वात अाघाडीवर असलेलं नाव म्हणजे सई ताम्हणकर. २०१८ मध्ये सर्वांची लाडकी सई अाता अधिकच बोल्ड अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला अाली अाहे.

बोल्ड फोटो केले शेअर

दुनियादारी, मंगलाष्टक वन्स मोअर, जाऊ द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक चित्रपटांतून अापल्या अभिनयाने सई हिनं प्रेक्षकांच्या मनात अापलं स्थान निर्माण केलं अाहे. नववर्षाचं स्वागत करताना सईनं अापल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर बोल्ड फोटो शेअर केले अाहेत. या फोटोमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत अाहे. नेहमीच हटके करणाऱ्या सईनं अापल्या चाहत्यांनाही हटके शुभेच्छा दिल्या अाहेत.

माझ्या अायुष्यातील नव्या अध्यायासाठी सज्ज

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. माझ्या अायुष्यातील नव्या अध्यायासाठी मी सज्ज झाले अाहे, अशा शब्दांत सईनं अापल्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या अाहेत. सईचे हे फोटो छायाचित्रकार तेजस नेरूरकरने काढले अाहेत. सईचा हा बोल्ड अंदाज तेजसनं अापल्या कॅमेऱ्यात कैद केला अाहे.

पुढील बातमी
इतर बातम्या