सैफ-करीनानं बांद्रामधलं घर दिलं भाड्यानं, 'इतकं' आहे घरभाडं

अभिनेता सैफ अली खान आणि करीना आपल्या मुलांसह नुकतंच त्यांच्या नव्या घरी शिफ्ट झाले आहेत. दोघेही आधी बांद्रा मधल्या फॉर्च्यून हाइट्समधल्या घरात राहत होते. करीनानं जेहला जन्म दिल्यानंतर लगेचच त्यांनी त्यांच्या नव्या घराचा शोध सुरू केला होता. त्यांच्या या जुन्या घरामधून आता त्यांच्या नव्या आशियानामध्ये शिफ्टमध्ये झाले आहेत.

बांद्रा इथल्या जुन्या घरासोबत जुन्या आठवणी जोडल्या गेल्या असल्यामुळे सैफ आणि करीनाने हे घर न विकता भाड्याने देण्याचा निर्णय घेतलाय. करीनाच्या डिलिव्हरीपूर्वीच या नवीन घराचे रेनोव्हेशनचे काम पूर्ण करण्यात आलं आणि सैफ-करीना या नवीन घरात शिफ्ट झाले. नुकतंच १६ ऑगस्ट रोजी सैफ अली खानच्या वाढदिवशी सर्व कुटूंब त्यांच्या नव्या घरी शिफ्ट झाले आहेत. त्यांच्या जुन्या घरासमोरच असलेल्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये हे कपल आपल्या मुलांसह रहायला गेले आहेत.

सैफ-करीनाचं बांद्रामधलं हे जुनं घर जवळपास 1500 चौरस फुटांचं आहे. यासाठी त्यांना महिन्याला ३,५ लाख रुपये इतकं घरभाड मिळतंय. असोसिएशन मीडिया एलएपी या फर्मने १५ लाख डिपॉजिट भरून घर रजिस्टर केलं आहे. या घरासमोर दोन कार पार्क करता येतील इतकी जागा या अपार्टमेंटमध्ये देण्यात आली आहे. सैफ-करीनानं हे घर तीन वर्षांसाठी भाड्यानं दिलं आहे.

बांद्रा इथल्या १५०० चौरस फुटांच्या घरात त्यांचं लग्न झालं होतं. २०१२ पासून या दोघांनीही याच घरात त्यांचा नवा संसार सुरू केला होता. २०१६ मध्ये मुलगा तैमूर जन्म देखील याच घरी झाला. दुसरा मुलगा जेहच्या जन्मापूर्वीपर्यंत ते येथेच वास्तव्याला होते. २०२० मध्ये जेव्हा करीना दुसऱ्यांदा गर्भवती झाली, तेव्हा तिने आणि सैफने नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यांची घरी बऱ्याच पाहूण्यांचं येणं-जाणं सुरू असतं. त्यामूळे त्या घरातील जागा अपूरी पडत असल्यामुळे दोघांनी नव्या घरी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

सध्या सैफी अली खान आणि करीना आपल्या मुलांसोबत मालदीव ट्रीप एन्जॉय करत आहेत. करीना कपूर खान सुद्धा तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवरून मालदीवमधील काही फोटो शेअर करत असते. करीनानं शेअर केलेल्या पहिल्या फोटोत सैफ, करीना, तैमूर, जेह (जहांगीर) हे चौघेजण दिसत आहे. तर एका फोटोत सैफ आणि करीना स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत.


हेही वाचा

तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्यानं वीर दासनं मागितली माफी

पुढील बातमी
इतर बातम्या