अखेर न्यायालयाने दिले 'नाव'

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

अंधेरी - 'गांधीगिरी' चित्रपटात श्रेयनाम मिळावे यासाठी उंबरठे झिजवणारे लेखक आणि दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना अखेर सत्र न्यायालयाने न्याय दिला आहे. चित्रपटात मिश्रा यांचे श्रेयनाम द्यावे, असा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे.

लेखक, दिग्दर्शक सनोज मिश्रा गेल्या 10 वर्षांपासून गांधीगिरी चित्रपटावर काम करत होते. मात्र चित्रपटात नाव नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. चित्रपटात मुख्य भूमिका करत असलेल्या ओम पुरी यांनीही निर्मात्याच्या दबावाखाली मौन पाळले. त्यामुळे मिश्रा यांनी दाद मागण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र सत्र न्यायालयाने सनोज मिश्रा यांच्या बाजूने न्याय देत चित्रपटात मिश्रा यांचे श्रेयनाम द्यावे, असा आदेश सत्र न्यायालयाने दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या