डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये बुधवारी जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टची चर्चा एकीकडे सुरू असताना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबतची 'ती' कोण होती? अशी खुमासदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
कोण आहे 'ती'?
जस्टिन बिबरचा शो बघण्यासाठी रुबल नागी ही आदित्य ठाकरे यांच्यासोबत आली होती. रुबल नागी आर्ट डायरेक्टर आहे. सामाजिक उपक्रमातही रुबल नागी नेहमी भाग घेत असते. कित्येक सेलिब्रिटींसोबतही तिने काम केलेले आहे.
दरम्यान, याबाबात ट्विटरवर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू उचलून धरली आहे. आदित्य ठाकरे यांचे व्यक्तिगत आयुष्य आहे, त्यांना त्यांचे आयुष्य जगू द्या. ट्रोल करण्याची सीमा असावी असे ट्विट त्यांनी केले आहे.