स्पायडर-मॅन मार्व्हल युनिव्हर्समधून बाहेर!

सुपरहिरोंच्या सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेले मार्व्हल स्टुडिओज आता स्पायडर-मॅन सीरिजची निर्मिती करणार नाहीत. याचाच अर्थ मार्व्हल युनिव्हर्सच्या कुठल्याही सिनेमांमध्ये यापुढं प्रेक्षकांना स्पायडर-मॅन दिसणार नाही. सोनी आणि डिस्ने स्टुडिओमधील आर्थिक वाद टोकाला गेल्याने मार्व्हलने हा निर्णय घेतला आहे. ज्याची प्रेक्षकांना यापुढं कायम हुरहूर राहणार आहे.

खर्चावरून वाद

उत्पन्नाच्या आणि नफ्याच्या विभाजनावरून या दोन्ही कंपन्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. स्पायडर-मॅन सिरीजच्या आगामी सिनेमांमध्ये सोनी कोर्पोरेशनने ५० टक्के खर्चाचा वाटा उचलण्याची मागणी डिस्नेकडून करण्यात आली होती. परंतु, 'सोनी'ला हा प्रस्ताव मंजूर नसल्याने दोन्ही कंपन्यांमध्ये वाद टोकाला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे मार्व्हल स्टुडिओजनं स्पायडर-मॅन सीरिजमधील सिनेमांची निर्मिती करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

 

घोर निराशा

सोनी कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 'मार्व्हल स्टुडिओचे अध्यक्ष केविन फिज यापुढे स्पायडर-मॅन सीरिजची निर्मिती करणार नाहीत. हा निर्णय आमच्यासाठी अत्यंत निराशाजनक असला तरी आम्ही त्यांच्या निर्णयाचा आणि मताचा आम्हाला आदर आहे. केविन यांनी इतकी वर्षे आम्हाला केलेल्या मदतीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.' असंही ‘सोनी’ने स्पष्ट केलं आहे. 

या निर्णयामुळे निराश झालेल्या स्पायडर-मॅनच्या चाहत्यांनी ‘सोनी’ आणि ‘डिस्ने’वर टीका सुरू केली आहे. यावरून ट्विटरवर #SaveSpiderMan हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. 


हेही वाचा-

‘सेक्रेड गेम्स’ वादात, शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अनुराग कश्यपविरोधात तक्रार

अमेयची इमेज ब्रेक करणार 'सेक्रेड गेम्स'


पुढील बातमी
इतर बातम्या