'लेक माझी लाडकी' मध्ये सुनील बर्वे वेगळ्या अंदाजात

मुंबई - संपूर्ण महाराष्ट्राला नात्यांच्या एका वेगळ्या प्रवाहात घेऊन जाणाऱ्या स्टार प्रवाहवरील 'लेक माझी लाडकी' या मालिकेत महत्त्वाचं वळण लागलं आहे. आई आणि मुलीच्या नाजूक नात्यावर आधारित असलेल्या या मालिकेच मराठीचा चिरतरुण अभिनेता सुनील बर्वे वेगळ्या अंदाजात रसिकांसमोर येणार आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी साकारलेल्या इरावती सुभेदार यांच्या भूतकाळातील पुरुष बनून सुनील बर्वे या मालिकेत वर्णी लावणार आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेद्वारे सुनील बर्वे पुन्हा एकदा एक गायक म्हणून लोकांसमोर येणार आहेत. मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर सुनील यांनी अभिनेता म्हणून ओळख कमावली असली तरी ते गायक देखील आहेत, याचा प्रत्यय 'लेक माझी लाडकी' या मालिकेत लावकरच पाहायला मिळेल.

सारेगमपामधून नावारुपास आलेले सुनील बर्वे यांनी अभिनयातही तितकचं नाव लौकीक आहे. यापूर्वी बर्वे यांनी अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजांचा गोडवा अनुभवण्याची नामी संधी 'लेक माझी लाडकी' या मालीकेमाधीन रसिकांना मिळणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या