सनी लिओनीने घेतले लातूरच्या मुलीला दत्तक!

बॉलिवूडची गोल्डन बेबी डॉल म्हणजेच अभिनेत्री सनी लिओन आई बनली आहे. सनी आणि तिचा पती डेनियल वेबर याने एका 21 महिन्यांच्या चिमुकलीला दत्तक घेतले आहे. महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातून दत्तक घेतलेल्या या मुलीचे नाव तिने निशा ठेवले आहे.

अभिनेत्री शर्लिन चोपडा हिने या गोड बातमीला दुजोरा देत सोशल मीडियावरून सनी लिओनेला शुभेच्छा दिल्या आहेत. शर्लिन चोपडा ट्विटमध्ये म्हणते 'सनी लिओन आणि डेनियल वेबर यांनी एका लहान परीला आपल्या घरी आणले आहे. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे'.

अभिनेता रितेश देशमुखनेही तिला शुभेच्छा देणारा संदेश पाठवला आहे.

तर अभिनेत्री ईशा गुप्ता हिने देखील ट्विट करून सनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

सनीने आणि डेनियलने दत्तक घेतलेल्या मुलीसोबतचा एक फोटो देखील ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत सनी आणि डेनियल हे खूपच खूश दिसत आहेत.

 सनीच्या घरी आलेल्या या लहान पाहुणीला शुभेच्छा देणारे संदेश पाठवणाऱ्या सर्व बॉलिवूड कलाकारांचे सनीने आभार मानलेत.

सनी आणि डेनियल 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. दत्तक घेतलेली निशा ही त्यांची पहिली मुलगी आहे.


हेही वाचा -

'सनी लिओन' मराठी सिनेमात झळकणार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या