टी-सिरीजने पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम याचं गाणं युट्यूबवर अपलोड केलं होतं. त्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हे गाणं तात्काळ न हटवल्यास टी-सिरीजला महागात पडेल, असा इशारा टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांना दिला होता. या इशाऱ्यानंतर टी-सिरीजने जाहीर माफी मागितली आहे. टी-सिरीजने हे गाणंही युट्यूबवरून काढून टाकलं आहे.
पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम याचं गाणं टी-सिरीजने युट्यूबवर अपलोड केल्यानंतर, भूषण कुमार तू याला धमकी समज, पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तर तुला खूप महागात पडेल, अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी इशारा दिला होता. सोनू निगम यांनी केलेल्या आरोपानुसार माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही. केलेले आरोप खरे असतील तर मागे पुढे पाहणार नाही. आतिफ अस्लम हा पाकिस्तानी गायक आहे. त्यामुळे तात्काळ त्याचे गाणे टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनलवरून काढून टाका, असं खोपकर यांनी म्हटलं होतं.
G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी
३० मिनिटात कोरोनाचं निदान, पालिकेचं 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग'