'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील आणखी एक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka ooltah chashmah) मालिकेतील आणखी एका कलाकाराला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मंदार चांदवादकर (Mandar Chandwadkar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंदार मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे ही व्यक्तिरेखा साकारतात. सध्या मंदार आणि त्यांचे कुटुंबीय होम क्वारंटाइन असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंदार यांनी सांगितलं की, "माझा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि मी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं घरातच उपचार घेत आहे. मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या प्रत्येक नियमाचं मी काटेकोरपणे पालन करत आहे."

काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील दयाबेनचा भाऊ सुंदरलाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सुंदरलाल तसं पाहायला गेलं तर शोमध्ये कधीतरीच दिसतो. पण संपूर्ण टीम चिंतेत होती. कारण टीमनं नुकतंच त्याच्यासोबत शूट केलं होतं.


हेही वाचा

'कोण होणार करोडपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन

पुढील बातमी
इतर बातम्या