दर्शिल सफारी झाला मोठा...

  • मंदार जोशी & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

मुंबई - 'तारे जमींन पर' या चित्रपटामधील दर्शिल सफारी आठवतोय का तुम्हांला ? दर्शिल प्रेक्षकांच्या हृदयात कायमस्वरूपी कोरला गेला होता. याच दर्शिलनं कालांतरानं बम बम भोले, झोकोमान यासारख्या काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. परंतु, तारे जमींन पर एवढं यश या चित्रपटांना मिळालं नाही. परंतु, आता पहिल्या चित्रपटाप्रमाणेच यश मिळवण्यासाठी दर्शिल पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. बाल दर्शिल आता मोठा झाला असून तो आता एका टीनएज लव्हस्टोरीमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्विकी असे या चित्रपटाचे नाव आहे. प्रदीप अतुलरी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या