ट्रॅप्ड चित्रपट कलाकारांचा जलवा

वर्सोवा - ट्रॅप्ड या चित्रपटाचे कलाकार बुधवारी जियो मामी 2016मध्ये रेड कार्पेटवर वॉक करताना दिसले. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी आणि अभिनेता राजकुमार यादव आपल्या गर्लफ्रेंडसोबत दिसला. मोटवानी हे एका पर्यटकासारखा पेहराव करून आले होते. राजकुमार यादवनं ब्लेजर आणि त्यावर बिना सॉक्सचे शूज घालून हटके स्टाईल केली होती. तर राजकुमार यादवची गर्लफ्रेंड पत्रलेखानं मिनि ड्रेस घातला होता. ट्रॅप्ड चित्रपटाचं नाव अजून फायनल झालं नाहिये. त्यात नंतर बदस केला जाईल, असं मोटवानी यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या