भारतीय क्रिकेट संघाचा कर्णाधार विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा हे दोघेही सोमवारी विवाहबद्ध झाले. इटलीतील टस्कनी शहरातील मिलान येथे या दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
यावेळी दोघांचे कुटंबिय आणि निकटवर्तीय मित्रांची उपस्थिती होती.
या दोघांच्या लग्नाचे आणि साखरपुड्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. या व्हिडिओत विराट आणि अनुष्का हे दोघेही आपल्या लग्नाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करताना दिसतात.
या दोघांनीही आपल्या लग्नाची गोड बातमी ट्वीटरवरून दिली.