सतत हटके ट्विट करून लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या विरू अर्थात विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा हटके ट्विट केले आहे. हे ट्विट त्याने दुसऱ्या तिसऱ्या कुणाला केले नसून आपला एकेकाळचा सहकारी आणि भारतीय गोलंदाज झहीर खान याला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत साखरपुडा झाल्याची माहिती झहीरने ट्विटरच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवली होती. विरूने 'आता घरात हॉकी स्टीक ठेवू नकोस' असं हटके ट्विट करून झहीरला शुभेच्छा दिल्या आहेत. झहीरची होणारी पत्नी सागरिकाने अनेक चित्रपटांत काम केले आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चक दे इंडिया' या सिनेमात ती प्रिती सबरवाल या हॉकीपटूच्या भूमिकेत दिसली होती. तसेच या भूमिकेमुळे तिला ओळख देखील मिळाली होती.
"झहीर तुझे अभिनंदन. हॉकीवर तू क्लिनबोल्ड झालास. पण आता घरात हॉकी स्टिक ठेवू नकोस, तुम्हा दोघांना खुुप खुप शुभेच्छा" असं ट्विट विरूने केले आहे. सचिन तेंडुलकरने देखील झहीर खान याला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान झहीर आणि सागरिकाला शुभेच्छा देताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा गोंधळ उडला. साखरपुड्याच्या शुभेच्छा देताना अनिल कुंबळे यांनी सागरिका घाटगेला टॅग करण्याऐवजी पत्रकार सागरिका घोष यांना टॅग केलं. मात्र चुकी लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्वीट डिलीट केलं आणि दुसरं ट्वीट करुन अभिनेत्री सागरिका घाटगेला टॅग केलं.
काय म्हणाला विरू ते पहा -