मराठी चित्रपटात झळकणार विवेक ओबेरॉय

मुंबई - हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांना मराठी सिनेमाचे वेध लागले आहेत हे काही वेगळं सांगायला नको. विद्या बालनपासून अगदी अमिताभ बच्चननेही मराठी सिनेमाचं कौतुक केलंय, अभिनयही केलाय. आता विवेक ओबेरॉयलाही मराठी सिनेसृष्टीचे वेध लागले आहेत. लवकरच तो मराठी सिनेमात दिसणार आहे, असं त्यानं स्वतःच मुंबईत एका कार्यक्रमात सांगितलंय. 'रितेश देशमुखने मला चित्रपटाची कथा ऐकवली आहे. कथेवर सध्या काम सुरू आहे. रितेश देशमुखने सांगितल्यावर तातडीनं शुटिंग सुरू होणार असल्याचंही विवेक ओबेरॉयनं सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या