5 जून रोजी सगळीकडे मोठ्या उत्साहात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिवशी अनेकांचे पर्यावरणाबाबत प्रेम देखील जागृत झाल्याचे पहायला मिळाले.
विशेष म्हणजे बाबूजींनी पर्यावरण दिनाच्या दुसऱ्या दिवशी वरळी हिलच्या जरीमरी मंदिर परिसरात 150 झाडे आणि डॉ. ई. मोझेस रोड येथील स्मशानभूमीत 200 झाडे लावली. त्यांच्या या उपक्रमात मनपा कर्मचारी, पोलीस अधिकारी, मंदिराचे पुजारी, स्मशानाचे राखणदार तसेच स्थानिकांनी देखील सहभाग घेतला. या सगळ्यांनी मिळून बाबूजींच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला हातभार लावला.
जर आपल्याला विकास करायचा असेल तर झाडे लावली पाहिजेत. आपल्या आसपासचा परिसर हा निसर्गरम्य असावा, ज्यामुळे त्याचा फायदा हा आपल्या शरीराला आपोआप होतो. पर्यावरण दिनाच्या दिवशीच वृक्षारोपण न करता रोज पर्यावरणाबाबत प्रत्येकामध्ये जागरुकता अाली पाहिजे.
- आर. जे. चरळीकर उर्फ बाबूजी
आज मुंबई पोलिसांना उन्हातान्हात काम करावे लागते. त्यावेळी कुठे तरी या झाडांच्या माध्यामातून पोलिस ड्युटी बजावताना सावलीत आराम करू शकतात. त्यामुळे बाबूजींच्या या उपक्रमाला आम्ही हातभार लावला.
- गजानन देशसुरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक