गोरेगावच्या एस. व्ही. रोड मार्गा (S.V.Road) वरून राममंदीरकडे जाणाऱ्या पुलावरील जलवाहिनी फुटल्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरीकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुंबई महापालिकेने मुंबईकरांना केलं आहे.
गोरेगाव व अंधेरी रीलीफ रोड येथून पूर्व - पश्चिम प्रवासासाठी पर्यायी मार्ग
हेही वाचा- मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा??
गोरेगावच्या एस.व्ही.रोड मार्गा (S.V.Road) वरून राममंदीरकडे जाणाऱ्या मृणाल गोरे उड्डाणपुलानजीकची जलवाहिनी फुटल्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने मृणाल गोरे उड्डाणपूल दक्षतेचा उपाय म्हणून बंद केला आहे. यामुळे गोरेगाव पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी महापालिकेने सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. आवश्यकता नसल्यास मुसळधार पावसात घराबाहेर पडू नये, प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं आमदार विद्या ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत मंगळवारपासून तब्बल २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसाने २६ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सप्टेंबर महिन्यात २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच २४ तासांमध्ये मुंबईत एवढा पाऊस पडला आहे. १९९४ ते २०२० या कालावधीत सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा एका दिवसात मुंबईत इतका पाऊस पडला. त्याचबरोबर १९७४- २०२० दरम्यान सप्टेंबर महिन्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला जोरदार पाऊस बुधवार सकाळपर्यंत सुरुच होता.
परिणामी भेंडीबाजार, गोल देऊळ, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, बावला कंपाऊंड, जे जे जंक्शन, हिंदमाता, काळाचौकी, सारथी बार, वरळी सी फेस येथे पाणी साचलं. या सर्व ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वाहतुकीचे मार्ग देखील वळवण्यात आले.
त्यानुसार बेस्टची वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात आली आहे:
अनावश्यक प्रवास करू नये. वाहतूक कोंडी टाळण्यास सहकार्य करावं, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.
हेही वाचा- मुंबईत पावसानं मोडला २६ वर्षातला विक्रम