मुंबई आणि उपनगरात तापमानात कमालीची घट झाली आहे. मागच्या 24 तासांता मुंबई आणि उपनगरात 18 अंश सेल्सिअस तापमानात नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
मुंबईत किमान तापमान 18.8अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रविवारी किमान तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईवर दाट धुक्याची चादर पसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर या भागात कडाक्याची थंडी आणि दाट धुके राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा आता श्रीलंकेकडे सरकला आहे. तसेच, या पट्ट्याची तीव्र ता कमी झाली आहे.
कुलाब्यात यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच किमान तापमान 18.5 अंशापर्यंत खाली आले आहे. शनिवारीच्या तुलनेत सांताक्रूझ येथील किमान तापमान 1 अंशाने आणि कुलाबा येथील 0.3 अंशाने कमी झाल्याची नोंदले. तर, सरासरी किमान तापमानाच्या तुलनेत सांताक्रूझ आणि कुलाबा येथील किमान तापमान अनुक्रमे 3 अंश आणि 2 अंशाने कमी झाले.
मागच्या वर्षी 29 डिसेंबरला किमान तापमान 17.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. शनिवारी मुंबई महानगर प्रदेशातील इतर शहरांच्या तुलनेत उपनगरात थंडी वाढली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे मागच्या 24 तासांत 17.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर कोल्हापूर (17.4) आणि रत्नागिरी (19.2) तापमानाची नोंद झाली. दरम्यान मुंबईकरांनाही मागच्या 24 तासांत दिवसा कमाल तापमान 28.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने उन्हाच्या झळांपासून सुटका झाली होती.
हेही वाचा