पुढील तीन दिवस मुंबईत उन्हाचे चटके आणखी वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवार ते बुधवार हे तीन दिवस मुंबईमधील तापमान वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत मुंबईचे कमाल तापमान 36 ते 37 अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
10 एप्रिलनंतर मुंबईतील तापमान कमी होईल. त्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळेल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.
याशिवाय आज कोकणााला उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरण असेल. काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी यावर्षी सर्वाधिक 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे यंदाच्या उन्हाळ्यातील हे रेकॉर्डब्रेक तापमान आहे. वाढती उष्णता आणि उन्हापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
भारतात एप्रिल ते जून दरम्यान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या काळात लोकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
देशात ज्या राज्यांना उष्णतेचया झळा जाणवणार आहेत त्यात महाराष्ट्रासह, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूचा समावेश आहे.
हेही वाचा