पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसंच, मुंबईसह इतर उपनगरांतही तापमान ४० अंशांपार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच मुंबईकरांना मे महिन्याहून अधिक उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
IMD नं म्हटले आहे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमान ३७ आणि ३८अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते.
पुढील दोन दिवसांत मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईसह, पालघर (Palghar), रायगड (Raigad), ठाण्यातही तापमान ४२ अंशांपार जाण्याचा अंदाज आहे.
सध्या सौराष्ट्र, कच्छ परिसरात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. शिवाय उत्तर कोकणात जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण-कोरड्या वाऱ्यांमुळे पुढील ४८ तासांत मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर (K. S. Hosaliakr) यांनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबईतील उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण दिलं आहे.
त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "येत्या २ दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान ३९°C राहील आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता, असल्याचं IMD नं सांगितलं आहे."
पुढे ते म्हणाले की, "कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ४.५°C वर आणि कमाल तापमान किमान ३७°C असावं."
हेही वाचा