हिवाळ्यात पावसाळा, राज्यात कोसळणार पाऊस

23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान किनारपट्टीवरील कोकण प्रदेश आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि त्याच्या लगतचे जिल्हे कोकण प्रशासकीय विभागाचा भाग आहेत.

"पूर्वेकडील वाऱ्यांमुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या भागात 23 ते 27 नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो," असे IMD च्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

24-27 नोव्हेंबर या कालावधीत, पुण्यात गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असे ते म्हणाले.


हेही वाचा

प्रदूषण कमी करण्यासाठी 1 डिसेंबरपासून रस्ते धुतले जाणार

डिसेंबरपासून मुंबईत 'या' मार्गावर इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार


पुढील बातमी
इतर बातम्या