पुढील ४८ तासात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता

येत्या ४८ तासांत मुंबईत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबई आणि ठाण्यासाठी गुरुवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.

तापमानात होणार घट

अवकाळी पावसामुळे येत्या काही दिवसांत तापमानात २-३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. बुधवारी शहरात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस होते.

गारपीट होण्याची शक्यता

IMD च्या अधिकारी सुषमा नायर म्हणाल्या, “पावसाचे काही संकेत आहेत, कारण महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातून खंडित होण्याची एक रेषा आहे, त्यामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागात गारपीट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर पश्चिमेकडील भागात गारपीट होण्याची शक्यता आहे."

त्या पुढे म्हणाल्या, “सावधगिरी म्हणून यलो अलर्ट देण्यात आला आहे, पण काळजी करण्यासारखे काही नाही.”

पावसामुळे शहरात दुपार आणि संध्याकाळपर्यंत ढगाळ आकाश आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या