IMDकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा, येलो अलर्ट जारी

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवणार आहे. तर, कोकण आणि नजीकच्या भागामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती असून, इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांच्या माहितीनुसार 25 आणि 26 फेब्रुवारी या दोन दिवशी राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

25 फेब्रुवारीला प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी इथं; तर 26 फेब्रुवारी रोजी पालघर इथं उष्मा वाढणार आहे. उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये तापमान वाढ कायम राहील असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी अशाही मार्गदर्शक सूचना यंत्रणेकडून जारी करण्यात आली आहे. 

सध्या तापमान सामान्यपेक्षा 4-5 अंशांनी जास्त आहे आणि उद्यापर्यंत ते जास्तच राहील, असे आयएमडीने सीएनबीसी-टीव्ही18 ला सांगितले. 26 फेब्रुवारी रोजी तापमान 1-2 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे, असेही त्यात म्हटले आहे.

आयएमडीने म्हटले आहे की 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी तापमान 1-2 अंशांनी कमी होऊ शकते. परंतु त्यामुळे उच्च तापमानापासून कोणताही मोठा दिलासा मिळणार नाही.


हेही वाचा

पालघर : 777 झाडांच्या कत्तलीस उच्च न्यायालयाची स्थगिती

2047 पर्यंत मीरा- भाईंदर प्रदूषणविरहीत

पुढील बातमी
इतर बातम्या