पर्यावरण रक्षणासाठी 'सेव्ह ट्री' मोहीम

मुंबई - चर्चगेट स्थानकाबाहेरील मंत्रालयाच्या दिशेने जाणाऱ्या जे. टाटा रोडवरील बहुसंख्य झाडांची मेट्रोच्या प्रकल्पात कत्तल होणार असल्याने चर्चगेट कफ परेड आणि आसपासच्या परिसरातील रहिवासी एमएमआरसी विरोधात दंड थोपटून उभे ठाकले आहेत. मेट्रो 3 च्या प्रकल्पात जवळपास 98 झाडांची कत्तल होणार असल्याने 'सेव्ह ट्री' चे सदस्य एकवटले आहेत. यासाठी 'सेव्ह ट्री' च्या माध्यमातून सह्यांची मोहिम राबवण्यात आली असून, जवळपास आतापर्यंत 1700 सह्या झाल्या आहेत. हे सह्यांचे पत्र लवकरच मुख्यमंत्र्यांना आणि एमएमआरसीला देण्यात येणार आहे. एमएमआरसी मात्र झाडांची कत्तल न करता प्रकल्प करता येणार नसल्यावर ठाम आहे. त्यामुळे 'सेव्ह ट्री'ने प्रसंगी न्यायालयात ही जाण्याची तयारी केली आहे. तेव्हा सेव्ह ट्री विरुद्ध एमएमआरसी असं चित्रं पाहायला मिळणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या