मुंबईत उशीरा दाखल होणार पाऊस

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी वाईट बातमी आहे. मुंबईत यंदा मान्सून उशीराने दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांना उकाड्यातच काढावे लागणार आहेत.  

२० जूनपर्यंत

हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट संस्थेच्या अंदाजानुसार मुंबईत पाऊस एक आठवडा ते १० दिवस उशीराने पडणार आहे. गेल्या वर्षी ९ जून रोजी मुंबईत पावसाने हजेरी लावली होती. परंतु स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा मुंबईत २० जूनपर्यंत पाऊस आगमन करू शकतो.   

चांगल्या पावसाची गरज

मुंबईकरांना पाऊस पडेपर्यंत पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी १० टक्के पाणीकपात केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये १२ मे पर्यंत १५ टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा मुंबईत चांगला पाऊस होण्याची आवश्यकता आहे. स्कायमेटने जून आणि जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

या वर्षी २८ दिवस भरतीचे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून दरम्यान २८ दिवस हाय टाइडचे असतील तर १२ दिवस नीप टाइड म्हणजेच भांगाची भरती राहील. या काळात मुंबईकरांना अनेकदा पुराचा सामना करावा लागला आहे. याकडे पाहता मुंबई महापालिकेने गटार, नाल्यांच्या साफसफाईचं काम वेगाने सुरू केलं आहे. 


हेही वाचा-

राणीच्या बागेत येणार गुजरातचे सिंह

लिंबू सरबत, ऊसाचा रस सांभाळून प्या, मुंबईतील ८१ टक्के बर्फाचे नमुने दूषित


पुढील बातमी
इतर बातम्या