७ ते १० जूनदरम्यान मान्सून होणार मुंबईत दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • पर्यावरण

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबकरांना लवकरच गारवा अनुभवता येणार आहे. कारण ७ ते १० जून दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान अनुकूल

२६ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला, तर सोमवारी मान्सूनचं केरळात आगमन झालं. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह देशात मान्सून दाखल होण्यासाठी हवामान अनुकूल आहे.

केरळमध्ये मान्सून २९ मे ला दाखल होणार अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली होती. स्कायमेटने मात्र मान्सून केरळात २८ मे रोजी दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सून कोकणमार्गे मुंबईत दाखल होइल.

मुंबईकरांच्या अडचणी वाढणार

यावर्षी पाऊस मुंबईकरांच्या अडचणींमध्ये वाढ करू शकतो. कारण सध्या शहरात मेट्रोचं काम जलद गतीनं सुरू आहे. शिवाय ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड या दोन्ही मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणींसाठी पालिकेने मेट्रोवर खापर फोडायला सुरुवात केली आहे. तर तिकडे एमएमआरडीएने आपण पालिकेसोबत काम करत असल्याचं सांगितलं.

येत्या २४ तासांत केरळमध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे. ३ ते ४ जूनपर्यंत तो कोकणात पोहचेल आणि १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होइल.

- बिश्वंभर सिंग, संचालक, कुलाबा वेधशाळा  


हेही वाचा-

मुंबईतल्या उकाड्यामागं 'हे' कारण!


पुढील बातमी
इतर बातम्या