हिवाळा सुरू होताच भारतातील बर्याच भागात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. नोंदीनुसार महाराष्ट्रातील बर्याच भागात तापमान कमी झाले आहे आणि जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा अधिक थंडी आहे. याचाच परिणाम मुंबईतल्या हवेवर देखील झाला आहे. शहरातील हवेची गुणवत्ताही बदलली आहे.
हवामान तज्ञांनी प्रकाशित केलेल्या अहवालावरून, असं दिसून आलं आहे की, हिवाळ्यात हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खराब झाली आहे. भारताच्या उत्तरेकडील शहरे अनेक महिन्यांपासून याचा अनुभव घेत आहेत आणि त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे.
उत्तरेकडील बर्याच भागांमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहचली आहे. याचा त्रास श्वसनाचे आजार असलेल्यांना होत आहे.
दिवसा, १५ डिसेंबर रोजी वांद्र्याचा निर्देशांक ४६८ (धोकादायक) होता. कुलाबाचा निर्देशांक ५० (चांगला) नोंदवला गेला. एक्यूआय इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वरून १६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १.३० वाजता ही माहिती उपलब्ध झाली.
गेल्या सात दिवसांत शहरातील सरासरी एक्यूआय १६१ असल्याचंही वेबसाइटनं म्हटलं आहे. सर्वात कमी सरासरी नोंद झाली आहे ९२, तर सर्वाधिक सरासरी ३४१ आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत म्हणजे १६ नोव्हेंबर २०२० पर्यंत सरासरी एक्यूआय १७१ होता. सर्वात कमी ५८ आणि २७ नोव्हेंबर २०२० रोजी सर्वाधिक ४५५ होता.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाचा अनुभव मुंबईकर घेत होते. त्यामुळे मुंबईतील तापमानात घट झाली आहे. अरबी समुद्रामध्ये गुजरातच्या दक्षिणेस वसलेल्या बेसिनच्या अवस्थेसह चक्रीवादळांना यासाठी कारणीभूत ठरवलं जातंय. मुंबईत १६ डिसेंबर रोजी रात्रीचे हवामान सरासरी आर्द्रतेसह २५ अंश नोंदवलं गेलं.
हेही वाचा