Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई, ‘हे’ रस्ते बंद

मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Rains) पडत असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्ते बंद (Road closed) करण्यात आले आहेत. येत्या २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.

बृहन्मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावं, असंही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, भेंडी बाजार जंक्शन, षण्मुखानंद हॉल, गोयल देऊळ, शेख मिस्त्री दरगाह मार्ग, मोतीलाल नगर इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.

दादर ते प्रभादेवी परिसरातील दृश्य पाहून अंगावर काटाच येईल..

गोरेगावच्या मोतीलाल नगर परिसरात पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे बेस्टचच्या बस आणि इतर गाड्या रस्त्यातच अडकल्या आहेत. यात काही प्रवासी देखील अडकल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे.

मोतीलाल नगर १ या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज परिसरात देखील पाणी साचलं. यामध्ये दुधाचा टेम्पो अडकला आहे.

पाणी साचल्यामुळे सायन हॉस्पीटल जवळील रोड बंद करण्यात आला आहे.

हिंदमात परिसरात पाणी साचल्यामुळे तो रस्ता देखील बंद आहे..

सायन किंग सर्कल परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावं लागतंय.

 

मालाडचा मार्वे रोड परिसर जलमय...


हेही वाचा

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लँडस्लाईड, गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक जाम

Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या